संघ, भाजपचं काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही

नाशिकमधील नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांची अखेर घरवापसी झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील नरिमन पॉईंट इथल्या भाजप कार्यालयात त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. भाजपमध्ये काम करताना अनेक कार्यकर्ते जोडले. पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न केला. मधल्या काळात थोडासा दुरावा झाला पण संघ आणि भाजपचं काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे, असं बाळासाहेब सानप म्हणाले.

First Published on: December 21, 2020 5:35 PM
Exit mobile version