…तर नागरिकांवर कडक कारवाई करणार!

महानगर पालिकेकडून सर्व नागरिकांना सूचना देण्यात आली आहे की, नागरिकांनी कचरा घरा बाहेर टाकू नये. आपल्या घरातील कचरा, कुंडीतच टाकावा. कोणीही कचरा घराच्या बाहेर किंवा इतर कुठेही फेकू नये. यामुळे कचरा सर्वत्र पसरला जातो आणि तो कचरा रस्त्यावर पडतो. तसेच नवी मुंबई महानगर पालिकेने जे डस्टबिन दिले आहेत त्यामध्ये कचरा गोळा करावा. ओला आणि सुका कचरा योग्य प्रकारे वेगळा होणे आवश्यक आहे. हे नियम मोडून जर कचरा टाकला गेला तर महानगर पालिकेकडून त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.

First Published on: March 1, 2023 6:51 PM
Exit mobile version