ट्रेनच्या डोअरवर हवा खाणं पडलं महागात

मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करताना डोअरवर उभं राहणं अनेकांना आवडतं. डोअरवर जागा मिळवण्यासाठी विंडो सिंटपेक्षाही जास्त भाडणं होतात. मात्र तुम्ही इथे उभ राहताना जर मस्ती करत असाल तर ती मस्ती तुमचा जीवही घेऊ शकते. अनेकांनी याआधी लोकलच्या दरवाजात आपला जीव गमावला आहे. अशीच डोअरवरची मस्ती एका व्हायरल व्हिडिओत कैद झालेली आहे. एक मुलगी लोकलच्या दरवाजावर उभे राहून आपलं जॅकेट सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. त्यानंतर समोरून येणाऱ्या लोकलला हात दाखवताना या मुलीची दरवाजाची पकड ढिली झाली आणि दुसऱ्याच क्षणी ती दरवाजावरच कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून एका दुसऱ्या प्रवाशाने तिला वेळीच पकडले आणि तिचा जीव थोडक्यात बचावला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशाप्रकारचा स्टंट जीवावर बेतू शकतो. त्यामुळे या मुलीसारखा स्टंट कुणीही करु नये. अन्यथा…

First Published on: October 2, 2018 3:52 PM
Exit mobile version