लोककला जिवंत ठेवणाऱ्या कलावंताला जपा

महाराष्ट्राची लोककला आणि लोकपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या कलावंत, त्यांचे सहकारी यांना उपजिवकेसाठी किमान आर्थिक मदत करावी, अशी मागणी प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा सेक्रेटरी सुप्रसिद्ध गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. लावणी, भारूड, वग, लोकसंगित, तमाशा, जागरण गोंधळ व ढोल लेझीम, बॅन्जो पथक अशा कित्येक प्रकारतुन हे कलाकार आपली लोककला सादर करून आपला उदरनिर्वाह करित असतात. चैत्र महिनापासुन महाराष्ट्रातील अनेक गावाच्या जत्रा व यात्रांना सुरवात होत असते. शिवजयंती, आंबेडकर जयंती, लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रमात या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते व यातुन मिळणाऱ्या मानधनावर यांचा कुटुबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रोजगारावर गंडातर आले आहे.

First Published on: March 28, 2020 5:05 PM
Exit mobile version