उत्पल पर्रिकर यांनी भाजपला रामराम ठोकला

गोवा विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठा भूकंप झाला असून, उमेदवारी न मिळालेल्या अनेक नेते, मंत्री, आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांचा समावेश असून, भाजपने पणजीतून उमेदवारी नाकारल्यानंतर याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय उत्पल पर्रिकर यांनी जाहीर केला आहे. भाजपला रामराम केल्यानंतर उत्पल पर्रिकर यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना पत्र लिहिलं आहे.

First Published on: January 22, 2022 9:24 PM
Exit mobile version