कोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर परिणाम झाला असून उद्या शनिवारी मुंबईला होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी ७६ हजार लिटर दूधाच्या संकलनात घट झाली. तर शुक्रवारी १० ते ११ लाख लिटर दूध संकलन घट होण्याचा अंदाज आहे. पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलन आणि विक्री वर देखील परिणाम झाला असल्याची माहिती गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.

First Published on: July 23, 2021 5:50 PM
Exit mobile version