दूधासह किराणा साहित्य घरोघरी मिळणार

रमजान ईद सणासाठी मुस्लिम बांधवांना घरपोच दूध, ड्रायफ्रूट्स आणि किराणा सामान देण्याचा सोलापूर पोलिसांनी निर्णय घेतला आहे. लॉकडाउनच्या काळात रमजान ईद आल्याने लोकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही. मात्र, प्रत्येक गावातील दुकानदार, दुग्ध व्यावसायिक, पोलीस स्टेशनचे अधिकारी यांची बैठक घेऊन याबाबतच नियोजन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी केले आहे. त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. ईदनिमित्त विनाकारण गर्दी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर पोलिसांकडून या अभिनव उपक्रम सुरु करण्यात येणार आहे.

First Published on: May 13, 2021 12:03 PM
Exit mobile version