आरोग्यमंत्र्यांनी सांगितली करोनाची जन्मकुंडली

जगभरात करोनाची प्रचंड दहशत पसरली असून चीनमध्ये त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येतो. जगातल्या इतरही काही देशांमध्ये करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. भारतात देखील केरळ, दिल्ली, जयपूर या ठिकाणी करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भिती आणि पर्यायाने अनेक गैरसमज देखील पसरले आहेत. महाराष्ट्रात करोनाची काय परिस्थिती आहे? त्यावर सरकार काय उपाययोजना करत आहे? त्याच्यापासून कसा बचाव करता येईल? या सगळ्या मुद्द्यांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत सविस्तर मुद्दे मांडले. यातून करोना व्हायरसची अक्षरश: कुंडलीच सगळ्यांसमोर उघडली गेली!

First Published on: March 4, 2020 6:26 PM
Exit mobile version