आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली कोरोनासंबंधीत माहिती

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केल्याची माहिती दिली. तसेच श्वसनासंबंधीत २० आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यात शेवटच्या क्षणी आलेल्या रुग्णांचे प्रमाण मृतांमध्ये जास्त आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जम्बो फॅसिलिटी खर्चिक आहे. आपल्याकडे आहे त्या ठिकाणी सुविधा वाढवण्यावर भर दिला जाणार, असेही राजेश टोपे म्हणाले.

First Published on: August 18, 2020 9:37 PM
Exit mobile version