ST संपकाऱ्यांचा तिढा सुटणार, २२ एप्रिलपर्यंत रुजू होण्याचे HC चे आदेश

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत. कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला महामंडळाने देखील सहमती दर्शवली आहे, त्यामुळे जवळपास सहा महिन्यांपासून सुरु असलेले संप कर्मचाऱ्यांनी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी सेवा आता पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. सर्व एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

First Published on: April 7, 2022 4:04 PM
Exit mobile version