ठाण्यात आणले ऐतिहासिक रेल्वे इंजिन वास्तू

भारतात रेल्वेमार्ग सुरू होण्याची घटना ही भारतीय इतिहासात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. रेल्वेमुळे दळणवळणाला चालना मिळाली असून रेल्वेला मुंबईची लाईफलाइन समजले जाते. ब्रिटिशांनी बोरिबंदर ते ठाणे या मार्गावर १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली गाडी धावली . त्यातच आता मिरज ते लातूर या मार्गावर नॅरो गेज लाईन वर धावणारे एक इंजिन मध्य रेल्वेने ठाणे स्थानकात आणले आहे. २०१८ साली ते सी एस एम टी स्थानकात आणून हेरिटेज गल्ली मध्ये ठेवण्यात आले होते. त्याआधी अनेक वर्षे भुसावळ येथे हे इंजिन होते. १९२८ साली हे इंजिन बनवण्यात आले होते. मात्र त्याचा वापर बंद झाल्यावर ते धूळ खात पडले होते. आता त्याला पुन्हा एकदा रंगरंगोटी करून आधीसारखे बनवण्यात आले आहे.

First Published on: April 2, 2021 12:54 PM
Exit mobile version