सोन्याच्या बांगडीसह समई आणि नाण्यांचा समावेश

ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर पुरातत्व विभागाच्यावतीने उत्खनन केले जात आहे. या मातीतून चक्क गेल्या काही दिवसंपासून सोन्याची समई, नाणी, अंगठी यासह अनेक वस्तू सापडत आहेत. दोन दिवसांपूर्वी श्री जगदिश्वर मंदिर परिसरात अशाच प्रकारे उत्खनन सुरू असताना आणखी काही वस्तू समोर आल्या. यामध्ये एक समई, सोन्याची अंगठी, बांगडी आणि नाणी सापडली आहेत. याबाबत प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी आश्चर्य व्यक्त करीत पुरातत्त्व विभागाचे कौतुक केले आहे.

First Published on: April 2, 2021 9:01 PM
Exit mobile version