मी आहे किचन किंग व्योम माझं नाव

साधारणत लहान मुलांना खेळण्यांचे वेड असते. त्यातही जर तो मुलगा असेल तर वेगवेगळ्या गाड्या, सुपरमॅन, प्लॅन, हेलिकॉप्टर, फुटबॉल, क्रिकेट यांची त्याला विशेष आवड असते. पण दोन वर्षांचा हा चिमुरडा सगळ्यात वेगळा आहे. तो गार्डनमध्ये किंवा मित्रांबरोबर खेळण्यापेक्षा किचनमध्ये रमतो. घरातल्या व ओळखीतल्या प्रत्येक व्यक्तीचे तो बारीक निरिक्षण करतो. त्यातही त्याचा बराचसा वेळ आजीबरोबर जात असल्याने तो तिच्याबरोबर किचनमध्ये असतो. तिचे निरिक्षण करता करता त्यालाही आता वेगवेगळी भांडी हाताळण्याबरोबरच जेवण बनवण्याची आवड निर्माण झाली आहे. कुकरचा उपयोग काय, फ्राय पॅन कशासाठी वापरतात. पुरी कशी लाटतात. हे त्याला ठाऊक आहे. बेडरुमचे त्याने किचन बनवलयं. रात्री बेरात्री त्याच्यातील शेफ अचानक उठतो आणि बेडरुमचा किचन होतो. आपल्या मुलात असलेले हे वेगळेपण त्याच्या आई बाबांनीही तेवढ्याच तन्मयतेने जपलंय.

First Published on: February 22, 2020 7:36 PM
Exit mobile version