इरफानच्या कुटुंबियांनी फेटाळले आरोप

उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरण चांगलेच गाजत असताना या प्रकरणाचे कनेक्शन बीडपर्यंत येऊन पोहचले आहे. इरफान खान नावाच्या तरुणाला अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतले आहे. तसेच इरफान मूळ बीडमधील परळी तालुक्यातील रहिवासी असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणानंतर बीडच्या परळीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अवैध धर्मांतरण प्रकरणात इरफानचं नाव आल्यामुळे त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे. इरफान असं करुच शकत नाही, अशी त्यांची भावना आहे. इरफानच्या कुटुंबियांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यामध्ये इरफानचा काहीही संबंध नसल्याचं त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे

First Published on: June 29, 2021 2:41 PM
Exit mobile version