आरोग्यासह सर्व सोयीसुविधांचे विलगीकरण कक्ष

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयाच्या भितीने रुग्ण गृहविलगीकरणाला प्राधान्य देत होते. मात्र, काटेकोर नियम पाळले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढत होती. यामुळे लोकसहभागातुन परिसरातच विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय तेर ग्रांमपंचायतीने घेतला आहे. परिसरातच सुसज्ज आणि आरोग्यासह सर्व सोयीसुविधांचे विलगीकरण कक्ष सुरू झाल्याने रुग्णांची भिती कमी झाली असून अनेक नागरीक या कक्षाला आर्थिक, धान्याच्या स्वरूपात मदत करत आहेत. गावातील खासगी डॉक्टर या कक्षाला निशुल्क सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

First Published on: May 25, 2021 6:42 PM
Exit mobile version