NCP चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मिश्किल टिप्पणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आपली भाषणशैली आणि विरोधकांना खोचक शब्दात प्रत्युत्तर देण्यासाठी ओळखले जातात. आता सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसवर मिश्किल टिप्पणी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ आहे. मात्र, शिवसेना आणि हाताच्या नादी लागल्यापासून घडाळ्याची वेळ चुकत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

First Published on: February 8, 2022 3:48 PM
Exit mobile version