शिवसेनेनंतर शिंदेंचा मोर्चा राष्ट्रवादीकडे? जयंत पाटलांनी दाखवली चूक

राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसेंची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी सभापतींना पत्र देण्यात आले आहे. मात्र त्यामध्ये विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते व प्रतोद हे पद रिक्त असल्याने एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते तर, अनिकेत तटकरे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली, असं लिहिण्यात आले आहे. यासंदर्भातील चूक जयंत पाटील यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निदर्शनास आणून दिली.

First Published on: March 13, 2023 1:10 PM
Exit mobile version