महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द, राज्यभरात वादाची ठिणगी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील ४० गावांवर दावा केल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तापला आहे. बोम्मईंच्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून सीमाप्रश्नी नेमलेले समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई मंगळवारी बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते, मात्र हा दौरा रद्द झाला. त्यातच दुसरीकडे कागलमार्गे महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात प्रवेश करता येणार नाही, असे आदेश बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे शिंदे सरकार कर्नाटकपुढे झुकते घेणार की, बेळगावात प्रवेश करण्याची धमक दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

First Published on: December 6, 2022 1:42 PM
Exit mobile version