कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांचे शहरावर लक्ष

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबात माहिती देताना विविध ठिकाणी विभागवारीनुसार आरोग्य केंद्र सुरू केल्याचे सांगितले. कल्याण-डोंबिवलीमधील कोरोनासंबंधीचा तपशील ते दररोज घेत असून त्याकरता ते स्वतः जागोजागी फिरून प्रशासनातील कामाचा आढावा घेत आहेत. हे शहर कोरोनाच्या संकटाला कशाप्रकारे सामोरे जात आहे, पालिकेने कोणत्या नवीन सुविधा नागरिकांन उपलब्ध केल्या आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपलं महानगरचे ठाणे आवृत्ती प्रतिनिधी संतोष गायकवाड यांना मुलाखतीत दिली.

First Published on: April 13, 2020 4:56 PM
Exit mobile version