Viral: केरळच्या माजी सैनिकाची पंतप्रधानांकडे मागणी

भारत-चीनच्या सीमेवर लष्करांच्या जवानांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे आर्मी, नेव्ही, वायू दलातील सर्वच आजी-माजी सैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. केरळमधील अशाच एका माजी लष्कर जवान हरीकृष्णन यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून या घटनांबाबत राग व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशातील सर्व माजी सैनिकांना पुन्हा सेवेत रूजू होण्याची परवानगी मिळावी, यासाठी विनंतीही त्यांनी केले आहे. 
First Published on: June 22, 2020 11:04 PM
Exit mobile version