एसआरए घोटाळ्यात किशोरी पेडणेकर चंद्रकांत चव्हाणांचा थेट संबंध

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गोमाता जनता एसआरएची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. दादर एसआरए घोटाळा आणि गोमाता जनता एसआरए घोटाळ्यात किशोरी पेडणेकर आणि सध्या जेलमध्ये असलेले चंद्रकांत चव्हाण यांचा डायरेक्ट संबंध आहे. किशोरी पेडणेकर यांना हिशेब तर द्यावाच लागणार, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.

First Published on: November 1, 2022 5:12 PM
Exit mobile version