किरीट सोमय्या कोर्लई ग्रामपंचायतीत दाखल, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

शिवसेना खासदार संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना 19 बंगले कुठे आहेत हे शोधून दाखवावं असं थेट आव्हान केलं होतं. दरम्यान आज भाजप नेते किरीट सोमय्या हे अलिबाग येथील कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये दाखल झाले. यावेळी भाजप नेते आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

First Published on: February 18, 2022 3:44 PM
Exit mobile version