रामदास कदमांच्या टीकेवर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर भावना व्यक्त करताना रामदास कदमांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोडावे असे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच जवळच्या व्यक्तींवर हल्लाबोल केला होता. यानंतर आता मुंबई माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया देताना जायचं आहे तर सरळ जा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका करु नका असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या

First Published on: July 19, 2022 4:32 PM
Exit mobile version