कुपर हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवा

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता हॉस्पिटल्सवरही ताण येत आहे. त्यामुळे हॉस्पिटलच्या बाहेर तपासणीसाठी तसेच उपचारासाठी नागरिकांना ताटकळतं बसावे लागत आहे. कुपर हॉस्पिटलमधील परिस्थितीही काहीशी वेगळी नाही. याबाबत येथील स्थानिक भाजप नगरसेविका सुनीता मेहता यांनी कुपर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी जादा बेडची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

First Published on: May 21, 2020 1:32 AM
Exit mobile version