लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा २०१९

दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. लालबाग राजा मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळी यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने पाद्यपूजनाच्या दर्शनासाठी भाविक दाखल झाले होते. लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी ८६ व्या वर्षात पदार्पण केलं. या पाद्यपूजन सोहळ्याला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली.

First Published on: June 20, 2019 7:52 PM
Exit mobile version