एसटीच्या प्रवासात मोठी घट

महाराष्ट्राची जीवनवाहीनी असणारी आणि लालपरी म्हटली जाणारी एसटीने राज्याच्या विकासात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. एखाद्या खेडे गावामध्ये कोणतेही वाहन जात नव्हते तेव्हा परिवहनाचे एकमात्र साधन एसटी होती. मात्र आजच्या एसटी महामंडळाचा ढिसाळ कारभारामुळे आपली लालपरी आर्थिक डबघाईत जात आहे. एसटी महामंडळाच्या बसगाड्या अस्वच्छ असल्यामुळे प्रवाशांनी कोरोना काळात एसटीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने महामंडळाचा प्रवासी महसूल कमी झाला आहे. त्यामुळे एसटीकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आणि कोरोना काळात एसटीचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून एसटी महामंडळाने बसेसची सखोल स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.तसेच प्रवासी व्यतिरिक्त महसूल वाढविण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहे.

First Published on: January 11, 2021 3:48 PM
Exit mobile version