अहमदनगर- कल्याण महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

अहमदनगर- कल्याण महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जबर जखमी झालेल्या बिबट मादीचा मृत्यू झाला आहे. उपचारा दरम्यान या बिबट्याचा मृत्या झाला आहे. रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी जबर जखमी झाली होती. या जखमी बिबट्यावर जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट निवारण केद्रांत उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान अखेर या बिबट मादीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यावेळी या बिबट्याचा अपघाता झाला त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. तसेच अनेकजण जखमी अवस्थेतील बिबट्याला डिवचत असल्याचे समोर आले आहे

First Published on: December 3, 2018 7:00 PM
Exit mobile version