अशी झाली ‘आनंदवन’ची सुरुवात

समाजसेवक बाबा आमटे यांचा २६डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात  झाला. गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. १९४३ मध्ये वंदेमातरमची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली आणि आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यांनी १९५२ मध्ये वरोड्याजवळ आनंदवनाची स्थापना केली. १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या आनंदवनात त्यांनी ३ हजार ५०० कुष्ठरोग्यांकरता घर बनवले. हा त्यांचा जन्मापासून शेवटपर्यंतचा प्रवास विलक्षण ठरला.

First Published on: December 26, 2020 2:38 PM
Exit mobile version