कोविड सेंटर हटवण्यात यावं, नागरिकांची मागणी

जळगाव जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यातच जिल्ह्यात कुठेही बेड देखील उपलब्ध नाही़त. त्यामुळे रुग्णांची परिस्थिती देखील अतिशय बिकट आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने गरज असलेल्या ठिकाणी कोविड सेंटर उभे करण्यात येत आहेत. यातच भुसावळमध्ये जामनेर रोडवरील येथे शिंधी कॉलनी येथे हिरो होंडा शोरूममध्ये आता कोविड सेंटर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक मास्क आणि इतर गोष्टी रस्त्यावर फेकतात. कुठेही बसतात. त्यामुळे याचा त्रास येथील स्थानिक रहिवाशांना होत असल्याने याठिकाणहून कोविड सेंटर हलवण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

First Published on: April 22, 2021 9:27 AM
Exit mobile version