अभिनेत्री तापसी पन्नूची स्थलांतरितांवर कविता

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला असून यामध्ये लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत झालेल्यांचे वर्णन एका कवितेतून केले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे अनेक उद्यागधंदे बंद झाले. त्यामुळे अनेक मजूरांच्या हातातली कामे गेली. खाण्यासाठी अन्न नाही, की खिशात पैसे नाही. या मजुरांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. त्यामुळे देशभरातील लाखो प्रवासी मजुरांच्या वेदना एका कवितेमार्फत तापसीने चाहत्यांसोबत आपल्या आवाजात शेअर केल्या आहेत.

First Published on: June 12, 2020 2:34 PM
Exit mobile version