लस न मिळाल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळ

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा घोळ कायम असून अपुऱ्या लसींच्या डोसमुळे पुणे शहरात आजही गोंधळ सुरु होता. बरेच नागरिक सकाळी ६ वाजल्यापासून लसीकरणासाठी रांगेत उभे होते. मात्र, ऐन वेळी तुम्हाला हवी ती लस उपलब्ध नसल्याचे सांगून नागरिकांना परत पाठवले. यामुळे लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ झाला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

First Published on: May 13, 2021 12:07 PM
Exit mobile version