रानमेव्याची विक्री करुन करत होते उदरनिर्वाह

कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा, राधानगरी, चंदगड, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा हे तालुके दुर्गम आहेत. जिल्ह्यात जवळपास ८० पेक्षा जास्त धनगरवाडे या दुर्गम भागात वास्तव्यास आहेत. तर एकट्या गगनबावडा तालुक्यात २० ते २५ धनगरवाडे आहेत. यांचा प्रमुख व्यवसाय शेळी-मेंढी पालन असला तरी जंगलाची राखण करत ते पारंपारिक व्यवसायावरच आपला उदरनिर्वाह सुरू ठेवतात. तर एप्रिल ते जून महिन्याच्या कालावधीत जंगलातील रानमेवा विकून वर्षभराचा चरितार्थ चालवतात. मात्र, गेल्यावर्षापासून कोरोनामुळे झालेली टाळेबंदी आणि यंदा सुरू असलेल्या निर्बंधामुळे यांना मोठा फटका बसला आहे. जंगलातील काजू, आंबा, करवंदे, अळू, फणस आणून शहरात विक्रीसाठी आणले जात होते. मात्र, गेल्या वर्षी लागलेली टाळेबंदी आणि यावर्षी सुरू असलेले कडक निर्बंध यामुळे रानमेवा विकताच आला नाही. त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

First Published on: May 25, 2021 10:00 PM
Exit mobile version