पंचमुखी रुद्राक्षाने साकारला महादेव

मुंबईतील ओमकार वाघ या कलाकाराने महाशिवरात्रीनिमित्त शंकराचं चित्र साकारलं आहे. पण, या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे ११ हजार ६६५ पंचमुखी रुद्राक्षातून महादेव साकारला आहे. रुद्राक्षांपासून कलाकृती साकारायची हा वसा ओमकारने गेल्या वर्षीपासून घेतला आहे. त्याने त्याच्या सहकाऱ्यांसोबत आतापर्यंत बऱ्याचशा कलाकृती साकारल्या आहेत. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्राचाही समावेश आहे.

First Published on: February 22, 2020 6:47 PM
Exit mobile version