मुख्यमंत्री शिंदे रमले शेतात, फळबागांची केली पाहाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील आपले मूळगाव दरे तांब येथे आले आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येथे पोहोचले असून ते दोन दिवसांच्या सुट्टीवर आहेत. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी बातचीत करत त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि मार्गी लावले. यासह मुख्यमंत्री शेतातही रमलेले पाहायला मिळाले.

First Published on: April 26, 2023 12:47 PM
Exit mobile version