महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीच्या आवाहनाला संमिश्र

औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. त्यानंतर गुरुवारी (९ मार्च) विनापरवानगी कँडल मार्च काढण्यात आला. या प्रकरणी खासदार जलील यांच्यासह १५०० अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या नामांतराच्या मुद्यावर आज (शुक्रवार) काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटी तर्फे शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

First Published on: March 10, 2023 7:15 PM
Exit mobile version