योग्य उपाययोजना आखल्यानंतरच मंदीरे उघडायला हवीत

सरकारने मॉल्स उघडण्यास परवानगी दिली आहे, त्याप्रमाणे मंदीरे उघडण्यास देखील परवानगी दिली पाहीजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. मात्र मंदीर उघडताना ट्रस्टींनी मंदीरात नियोजन कसे करणार? याचीही माहिती द्यावी लागेल. कारण मंदीरे उघडल्यानंतर मशीद, चर्च सगळंच खुले करावे लागेल. मग त्यानंतर त्यावर नियंत्रण आणायचे कसे? याचेही नियोजन करुनच मंदीर उघडण्यासाठी परवानगी मागायला हवी, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. त्र्यंबकेश्वर येथील पुजाऱ्यांचे एक शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले होते. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली.

First Published on: August 18, 2020 9:24 PM
Exit mobile version