धार्मिक स्थळांसह मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह पूर्णत: बंद

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन केले जाणार आहे. मात्र, हे लॉकडाऊन मर्यादित असणार असून यामध्ये सर्वसामान्यांकरता सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या लोकलचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. तर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना परवानगी देण्यात येणार. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळे, मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह देखील पूर्णत: बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

First Published on: April 1, 2021 7:51 PM
Exit mobile version