महाराष्ट्र राजभाषा विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुर

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजुरी मिळाली आहे. विधान परिषदेचे सदस्य आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज दोन्ही सभागृहामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणे यांच्या कारभारात मराठी भाषेचा वापर करण्यासाठी तरतूद करणारे विधेयक मांडले. मात्र, या विधेयकाला एकमताने विधानसभेनंतर विधानपरिषदेत मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभारात यापुढे मराठी भाषेचा वापर करण्यात येणार आहे.

First Published on: March 24, 2022 5:56 PM
Exit mobile version