खड्ड्यांच्या पाहणीसाठी महापौर उतरले रस्त्यावर

मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे पालिका प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका होऊ लागली आहे. याचीच दखल घेत आता रस्ते बुझवण्याच्या कामाला देखील वेग आला आहे. मात्र मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आज चक्क रस्त्यांची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरले. मात्र पालिकेच्या रस्त्यांची पाहणी करता करता त्यांनी राज्य सरकारच्या अत्यारित येणाऱ्या रस्त्यांची देखील पाहणी केली. याचा बाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी.

First Published on: July 16, 2018 11:44 AM
Exit mobile version