कोल्हापूरात दूध आंदोलनाची अनोखी दवंडी

महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांनी आज मध्यरात्रीपासून दुध आंदोलनाला सूरुवात झाली आहे. त्यामुळे दूध संकलन करणारे दूध संघ आज बंद असणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी हे रणशिंग फुंकले आहे. कोल्हापुरातला गोकुळ दूध संघात जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात दूध येते. पण दूध आंदोलनामुळे गोकुळ संघ बंद असल्याने जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आज डेअरीमध्ये दूध भरु नये, असे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे.

दरम्यान, कोल्हापुर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली. चंदगडमध्ये असणाऱ्या सुंडी या गावात लोकांना दूध आंदोलन सुरु असल्याने संपाबद्दल माहीती देण्यासाठी चक्क दवंडी पिटवण्यात आली आहे. या व्हिडिओत एक माणूस लोकांना मोठमोठ्याने सांगतोय की, आज डेअरीमध्ये दूध भरु नका कारण दूध संघ बंद असणार आहेत. संप सुरु असल्याने कुणीही डेअरीत दूध भरु नये अस आवाहन गावातल्या लोकांना करण्यात आले आहे.

काय आहे हा नेमका प्रकार?

आजही कित्येक खेड्यांमध्ये जुन्या पद्धतीने आपापली संस्कृती जपली जाते. पुर्वी संपुर्ण गावात संदेश पोहोचवण्यासाठी दवंडी पिटवली जायची जी आजही कित्येक खेड्यात दिली जाते. सण, वार, आणि एखाद्या महत्वाच्या गोष्टीची संपूर्ण गावाला माहीती देण्यासाठी या दवंडीचा वापर केला जातो.
First Published on: July 16, 2018 1:41 PM
Exit mobile version