पावसाने केले लाखोंचे नुकसान

येडेश्वरी साखर कारखान्याने यंदा सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केलं होतं. आणि हिच साखर पॅकिंग करून गोदामात स्टोअर करण्यात आली होती. मात्र, मागील दोन दिवसात झालेल्या पावसाने कारखान्याच्या गोदामातील सर्व साखर भिजून गेली. गोदामातील पाणी काढण्यासाठी ४० ते ५० कामगार प्रयत्न करत होते. मात्र, अर्ध्या तासात १३० मिलिमीटर पाऊस झाला आणि कारखान्यात ठेवलेले ३० हजार साखरेचे पोते पाण्यात गेले. यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

First Published on: June 16, 2021 4:12 PM
Exit mobile version