आमदारांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत

देशावर कोरोनाच्या रुपाने मोठं संकट आलं आहे. या संकंटाचा सामना करताना देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येणार आहे. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेच्या आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आमदारांचा निर्णय मुख्यमंत्र्यांना सांगितला.

First Published on: March 27, 2020 1:49 PM
Exit mobile version