शरद पवारांचा राजीनामा, पक्षासाठी मास्टर स्ट्रोक

मनसे आमदार राजू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाबाबत ज्या काही अफवा सुरू होत्या, त्या थांबवण्यासाठी शरद पवारांचा हा मास्टर स्ट्रोक असावा, असे राजू पाटील म्हणाले. शरद पवार यांनी निर्णय घेतल्यावर पक्षाच्या भवितव्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. हा पक्षांतर्गत प्रश्न असल्यामुळे राजू पाटील यांनीही याबाबत बोलण्यास फारसे स्वारस्य दाखवले नाही.

First Published on: May 3, 2023 12:58 PM
Exit mobile version