शिवसेनेत विधानपरिषदेच्या जागेसाठी रस्सीखेच सुरु

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ६ जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. वर्षाच्या अखेरीस एकूण ६ विधानपरिषदेच्या ६ सदस्यांची मुदत संपत आहे. या सदस्यांच्या मतदारसंघात राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. शिवसेनेकडून अनेक नेत्यांनी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तर सध्याचे आमदार रामदास कदम यांना पुन्हा संधी देण्यात येणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रामदास कदम यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे कदमांची विधानपरिषदेवरील वाटचाल संपुष्टात येणार आहे.

First Published on: November 9, 2021 7:19 PM
Exit mobile version