‘बोल…बजरंग बली की जय’! | मनसेनं फोडली सरकारच्या निषेधाची हंडी

राज्यात कोरोनाचा कहर अद्याप पुर्णतः संपलेला नसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना देखील कृष्ण जन्माष्टमीच्या मुर्हतावर ठाण्यात मनसेने दहीहंडी फोडून दहीहंडी उत्सवाचे स्वागत केले. ठाणे पोलिसांच्या समोरच मनसेने दोन थर लावून हंडी फोडली. मनसेने पोलिसांसमोरच दहीहंडी फोडल्याने मनसेचे कार्यकर्ते आणि गोविंदा पथकांसह मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. इतकेच नव्हे तर हंडी फोडल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या आहेत.

First Published on: August 31, 2021 1:08 PM
Exit mobile version