भाजपनंतर मनसेकडून मंदिरे उघडण्याची मागणी

राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप पाठोपाठ आता मनसेनेही पुढाकार घेतला आहे. नाशिकच्या अतिप्राचीन श्री काळाराम मंदिरासमोर मनसेने केले आरती आंदोलन केले. सरकारच्या प्रतिकात्मक फोटोची आरती करण्यात आली. आरती नंतर प्रसाद म्हणून मनसेने ‘गाजर’ वाटले. पोलिसांनी परवानगी अभावी मनसेचे आंदोलन चिरडले आणि आरती करण्याआधी आंदोलकांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले.

First Published on: September 2, 2021 3:47 PM
Exit mobile version