मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

लॉकडाऊनमुळे परदेशात अडकलेल्या मराठी बंधू भगिनींना वंदे भारत योजनेद्वारे विशेष विमान फेऱ्या आयोजित करून महाराष्ट्रात परत आणावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी जितेंद्र ठाकरे यांनी पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार करून केली आहे. दुबई, अबुधाबी आणि इतर आखाती देशांत अनेक मराठी बांधव अडकून पडले आहेत. युनायटेड अरब अमिरातीत (UAE) अडकून पडलेल्या अनेक मराठी महिला-पुरुषांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि सरचिटणीस शालिनी ठाकरे यांना लेखी पत्र पाठवले होते. ज्या लोकांना त्वरित महाराष्ट्रात आणण्याची गरज आहे, अशा ४७२ मराठी लोकांची यादीसुद्धा शालिनी ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या संबंधित विभागांना पाठवली आहे.

First Published on: May 29, 2020 9:07 PM
Exit mobile version