सरकार आणि सिडको विरोधात मनसेचे ‘बोंबा मारो’ आंदोलन

सिडकोने २०१८-१९ मध्ये दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी जवळपास १८ हजार घरांची लॉटरी काढली होती. या लोकांना सिडकोने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर २०२०ला घराचा ताबा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जवळपास ५ हजार सिडको सोड्तधारकांनी पूर्ण रक्कम भरलेली असताना देखील घरांचा ताबा अजून सिडकोने दिला नाही. जवळपास सर्व सोड्तधारकांनी कर्ज काढून सिडकोला पैसे दिले आहेत. या घरांचे नियमित हप्ते या सोड्तधारकांना भरावे लागत आहेत. तसेच घर नसल्यामुळे भाड्याचे पैसे ही द्यावे लागत आहेत. त्यामुळे हे सोड्तधारक दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांचे ६० हजार ते १ लाख रुपये आर्थिक नुकसान उशिरा घराचा ताबा मिळाल्यामुळे होणार आहे. अशा परिस्थितीत सिडको या सोडत धारकांना देखभाल आणि दुरुस्ती खर्चापोटी आकारात असलेले ५८ हजार रुपये माफ करावे, अशी रास्त मागणी हे सोड्तधारक करत असून ते तात्काळ माफ करण्यात यावे. याकरता मनसेने आज बोंबा मारो आंदोलन केले. आता यावर सिडको प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

First Published on: June 1, 2021 6:52 PM
Exit mobile version