एकला चलो रे..! मनसेचा नारा, युतीसंदर्भात स्पष्ट भूमिका

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची जवळीक शिंदे गट तसचे भाजपासोबत वाढत चालली होती. यामुळे राजकीय वर्तुळात तसेच माध्यमांमध्ये मनसे या दोन पक्षांशी युती करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे युतीसंदर्भात भाष्य केलंय. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जागेवर आपले उमेदवार उभे करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत, अशी माहिती संदीप देशपांडेंनी दिली आहे.

First Published on: September 14, 2022 4:21 PM
Exit mobile version