घरगुती सामानातून तरूणाने बनवला व्हेंटिलेटर!

जगात कोरोना थैमान घालत असल्याने बळींची संख्या वाढत आहे. कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने आणि जेवढे रुग्ण वाढले तेवढी उपचार यंत्रणा आणि खासकरून व्हेंटिलेटर नसल्यानं मृत्यूचा आकडा वाढतो आहे. हाच धोका भारतात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतो. नेमका हाच धोका ओळखून मुंबईतील २१ वर्षीय तरुणाने मोबाइल व्हेंटिलेटर बनवला आहे. कांदिवली पूर्वेतील त्रिलोक सावंत याने अवघ्या २५० रुपयात आणि घरगुती सामानाचा वापर करत मोबाईल व्हेंटिलेटर बनवला आहे.

First Published on: April 13, 2020 8:02 PM
Exit mobile version